वर्तुळ | Circle


 वर्तुळ | Circle

वर्तुळ | Circle

वर्तुळ

■ उपघटक –  त्रिज्याव्यासजीवाकेंद्रपरीघ,  आंतरभागबाहयभागवर्तुळकंस

■ त्रिज्या –  वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय. 

एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात.

■ जीवा-  वर्तुहावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय

■ व्यास – वर्तुळ केंद्रातून जाणा-या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात.

व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.

वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो.

■ वर्तुळाचा आंतरभाग – वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा आंतरभाग म्हणतात.

■ वर्तुळाचा बाहयभाग –  वर्तुळाच्या बाहेर असलेल्या भागाला वर्तुळाचा बाहयभाग म्हणतात.

■ वर्तुळाचा परीघ – वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला परीघ म्हणतात.

■ वर्तुळ कंस  वर्तुळ परीघाच्या लहान मोठया भागांना वर्तुळकंस म्हणतात.

वर्तुळ कंसाला तीन अक्षरी नाव देतात

O – वर्तुळ केंद्र

OP – त्रिज्या                 


QP – जीवा    

RP – व्यास

RQP – वर्तुळ कंस

S,T – वर्तुळाच्या आंतरभागातील बिंदू

M,N – वर्तुळाच्या बाहयभागातील बिंदू

R,Q,P – वर्तुहावरील बिंदू


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!