इ.५ वी शिष्यवृत्ती-गणितइ.५ वी. शिष्यवृत्ती

भागाकार | Division


 भागाकार | Division

भागाकार | Dvision

भागाकार

  भागाकार म्हणजे वाटणीविभागणी , समान वाटा करणे.

भागाकार या घटकात उदाहरणामध्ये भाज्यभाजकभागाकार  बाकी यांच्या परस्पर संबंधातील कोणतेही तीन घटक येउून त्यातील एक घटक दिला. उर्वरित घटक काढणे.

सूत्र    

1 )  भाज्य = भाजक x भागाकार  + बाकी

2 )  भाजक =  ( भाज्य  बाकी) ÷ भागाकार

3)   भागाकार =   ( भाज्य  बाकी ) ÷ भाजक

 कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर तीच संख्या येते.

👉 अपूर्णांकात अंशस्थानी असलेली संख्या भाज्य असते.  तर छेदस्थानी असलेली संख्या भाजक असते.

उदा.  60 ÷ 6

       60  – भाज्य

        6  – भाजक

 **********************

1)  अनेकांची किंमत दिली असता त्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार केला जातो.

2) ज्या संख्येने भागतात तिला भाजक  ज्या संख्येला भागतात तिला भाज्य म्हणतात. येणाया उत्तराला भागाकार म्हणतात.

वरील सुत्रानुसार  भाज्य = भाजक  भागाकार + बाकी   30 = 7  4 + 2

—————————————-

 लक्षात ठेवा :  भाज्य = ( भाजक x भागाकार ) + बाकी

गुणाकार  भागाकार परस्परविरूदध क्रिया आहेत.

9 x5 = 45   यावरून  45 ÷ 9 = 5 आणि 45 ÷ 5 = 9 हे दोन भागाकार मिळतात.

 शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास भागाकार शून्यच येतो.

 कोणत्याही संख्येला 1  भागले असता  येणारा भागाकार तीच संख्या असते.

 **********************

👉 नमुना प्रश्न 

1)      1) 4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागलेतर भागाकारात कितीचा फरक पडेल ?

1)      1)1628   2)   1221  3) 1407   4) 407

स्पष्टीकरण :  4884 ÷ 4 = 1221 आणि 4884 ÷ 3 =1628

        या दोन भागाकारांतील फरक (1628 – 1221 ) = 407 आहे.

    पर्याय क्र. 4  हे अचूक उत्तर आहे.

————————————-

 2)       भागाकाराच्या एका उदाहरणातभाजक 27भागाकार 44  बाकी 19 आहे ;  तर भाज्य किती असेल?

 1)     1188   2) 836   3)  557   4)  1207स्पष्टीकरण :  भाज्य = भाजक X भागाकार + बाकी

                = 27 44 + 19 = 1188 + 19 = 1207

   पर्याय क्र. 4  हे अचूक उत्तर आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!