इ.५ वी शिष्यवृत्ती-गणितइ.५ वी. शिष्यवृत्ती

पदावली व अक्षरांचा वापर | Expression and the use of letters in place of numbers


पदावली व अक्षरांचा वापर | Expression and the use of letters in place of numbers 

पदावली व अक्षरांचा वापर | Expression and the use of letters in place of numbers

पदावली व अक्षरांचा वापर

  गणिती क्रिया बेरीजवजाबाकीगुणाकार व भागाकार एकत्रितपणे पदावलीमध्ये दिलेल्या असतात.

 दोनपेक्षा अधिक क्रिया एखादया उदाहरणात असल्यास खालील पद्धतीने त्या कराव्यात त्याचा 

 क्रम असा असावा :  कंसभागाकारगुणाकारबेरीजवजाबाकी

दिलेल्या उदाहरणात कंस दिला असेल तर त्या कंसातील रित प्रथम करावी.  त्यानंतर डावीकडून प्रथम 

गुणाकार किंवा भागाकार असेल तर प्रथम करावा.

शेवटी डावीकडून बेरीज / वजाबाकी करावी. 

—————————————————-

  नमुना उदा. 

 35 ÷ 7 + 4 – ( 2 x 3 ) प्रथम कंस सोडवावा.

25÷ 5 + 4 – 6    भागाकार

= 5 + 4 – 6    बेरीज

= 9 – 6  वजाबाकी

= 3

—————————————————-

  अक्षराचा वापर :  गणितामध्ये कोणत्याही संख्येसाठी अक्षराचा वापर करून गुणधर्म सांगता येतात. 

                             उदा. a x 0 = 0

 याचाच अर्थ : कोणत्याही संख्येस शून्याने गुणले असता गुणाकार शून्य येतो

 जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान नसतेतेव्हा त्या दोन पदावल्यांमध्ये असमानता आहे असे म्हणतात.

 कोणत्याही दोन संख्यांवर या क्रिया केल्या असता येणारे उत्तर ही सुद्धा एक संख्याच असते.

 नमुना प्रश्न

1)     7÷ 7 + 7 x 7 – 7  चे सोपे रूप कोणते?

        1)  1    2) 43   3)  41  4)  49

 स्पष्टीकरण : पदावली सोडवण्यासाठी ‘ कचेभागुबेव ‘ या क्रमाचा उपयोग करू.

     ( 7÷ 7 )+ (7 x 7 )- 7 = 1 + 49 – 7 = 43 हे उत्तर मिळते

पर्याय क्र. 2   हे अचूक उत्तर आहे.

 —————————————————-

 2)   K = 5  M =3 असेल तर, 5 x K + M = किती ?

      1) 20    2) 13   3)  28   4)  40

 स्पष्टीकरण :  अक्षराची किंमत घालून पदावली सोडवावी.

5 x K + M = किती ?

= 5 x(5) + 3 = 

= 25 + 3 = 28

पर्याय क्र.  3  हे  अचूक उत्तर आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!