गुणाकार | Multiplication
गुणाकार | Multiplication
गुणाकार
■ गुणाकार – एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणे. या क्रियेला गुणाकार म्हणतात
■ गुणाकार या क्रियेमध्ये गुण्य, गुणक व गुणाकार हे घटक असतात.
■ गुण्य X गुणक = गुणाकार
5785 X 5 = 28925
गुण्य = 5785
गुणक = 5
गुणाकार= 28925
———————————
■ गुणाकाराचे नियम –
■ कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार नेहमी शून्य येतो. 0 x 6
———————————
■ गुण्य, गुणक व गुणाकार यापैकी दोन घटक दिलेले असतात. तेव्हा तिसरा घटक काढता येतो.
———————————
■ कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते. उदा 57×1 =57
———————————
■ कोणत्याही संख्येला 10, 100, 1000……. अशा म्हणजे एकावर शून्य असणा–या संख्यांनी गुणताना, गुणाकारत गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्यांएवढी शून्ये लिहावीत
———————————
■ दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो. या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतो, तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो.
———————————
■ दोन अंकांचा गुणाकार करताना , गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल, हे समजणे काही वेळा जरूरी असते. अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत,
———————————
■ नमुना प्रश्न
1) 1) 100 रू च्या नोटांच्या बंडलामध्ये काही नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत किती असणार नाही?
1 1) 35000 2) 4900 3) 9400 4) 8540
स्पष्टीकरण : 100 रू. च्या नोटांची एकूण रक्कम मोजताना नोटांची संख्या x 100 असे करावे लागेल.
एकूण रक्कमेच्या दशक एकक स्थानी 00 असे अंक येतील
उत्तर पर्याय क्र. : 4 हे अचूक उत्तर आहे
———————————
2) एका रांगेत 215 या प्रमाणे 132 रांगामध्ये किती रोपे लावता येतील?
1) 28280 2) 28380 3) 28340 4 ) 27380
स्पष्टीकरण : एका रांगेत लावलेल्या रोपांच्या संख्येवरून अनेक रांगांत लावलेली एकूण रोपटयांची संख्या काढायची आहे म्हणजे 215 व 132 यांचा गुणाकार केला. गुणाकार 28380 आला. ( गुणाकार पटकन करता यावा म्हणून त्यातील संख्यांची फोड केली.
215 x 132 = 132 (200+15) = 132 x 200 + 132 x 15 = 26400 + 1980 = 28380
पर्याय क्र. : 2 हे अचूक उत्तर आहे