इ.५ वी शिष्यवृत्ती-गणितइ.५ वी. शिष्यवृत्ती

कोन व कोनांचे प्रकार | Types of Angles


कोन व कोनांचे प्रकार | Types of Angles

 

कोन व कोनांचे प्रकार | Types of Angles

कोन व कोनांचे प्रकार

 

*A)  बिंदू,  रेषा, रेषाखंड व किरण

 
1)  बिंदू – बिंदू म्हणजे अशी लहानात लहान आकृती  कि त्या आकृतीला लांबी ,रुंदी व उंची नसते.
 
     आकृती: –      
 
     गुणधर्म:- एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात.
*****************************************
2)  रेषा :- रेषा ही दोन्ही बाजूना अमर्यादित लांबीची असते. रेषेची लांबी मोजता येत नाही.
                 (दोन्ही बाजूंना बाण असतात.)

     आकृती: –      

 

 
     गुणधर्म:- दिलेल्या दोन बिंदूतून  एक आणि एकच रेषा काढता येते.

*************************

 

3) रेषाखंड :- रेषाखंड  दोन्ही बाजूना मर्यादित लांबीचा  असतो . रेषाखंडाची  लांबी मोजता येते.
                         (दोन्ही बाजूंना  बाण नसतात .)
     आकृती: – 

 
     गुणधर्म:- दोन्ही बाजूंनी खंडीत  असते.

*************************

 

4) किरण :- किरण  एका बाजूंनी  मर्यादित लांबीचा  असतो . किरणची  लांबी मोजता येत नाही.
                  एकाच   बाजूला   बाण असतो .)
 
     गुणधर्म:- बाणाच्या एकाच दिशेने रेषा अमर्यादित/अखंडीत असते.

*************************

B) कोन  

  
शिरोबिंदू – 
 प्रत्येक कोनाला एक शिरोबिंदू असतो. हा ABC  चा शिरोबिंदू आहे.
 
भुजा:- कोनाला दोन भुजा असतात.  ( भुजा) बाजू BA व बाजू BC
 
कोनाचे वाचन: – किंवा ABC किंवा CBA

*************************

C) कोनाचे प्रकार :-

      १) लघुकोन :-  0º  पेक्षा जास्त व 90º पेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन म्हणतात.
                      

*************************

     २) काटकोन :- 90º मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात.

                          

*************************

 
   ३) विशालकोन :- 90º पेक्षा जास्त व 180º  पेक्षा कमी मापाच्या कोनाला विशालकोन म्हणतात.

                   

See also  इ 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा - प्रथम भाषा व गणित - फेब्रु. 2020 A (Quiz)

*************************

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!