अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी | Face value, place value of a digit and expanded form of a number
अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी
अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी
दर्शनी किंमत : संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकांच्या मूल्याइतकी असते. (तोच अंक )
उदा. 3452 मधे, 3,4,5,2 यांची दर्शनी किंमत अनुक्रमे 3, 4, 5, 2 ही आहे.
स्थानिक किंमत : संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते.
अंकाची स्थानिक किंमत = अंक x स्थानाची किंमत
उदा. 47952 मधे;
7 ची स्था. किं. = 7 x ( ‘हजार‘ स्थानाची किंमत )
= 7 x 1000
= 7000
एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानांवर समान अंक असेल, तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकांच्या नऊ पट असतो.
उदा. : ४५२७७ या संख्येतील दशक व एकक स्थानी ७ अंक आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक (७०-७) = ६३ म्हणजेच ९ ७ ७ = ६३
खालील तक्ता पहा.
स्थानाचे नाव
अब्ज —–1,00,00,00,000
दशकोटी———–10,00,00,000
कोटी—————1,00,00,000
दशलक्ष———–10,00,000
लक्ष—————1,00,000
दशहजार———10,000
हजार———–1,000
शतक———100
दशक——10
एकक——-1
स्थानाची किंमत
संख्येतील अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानाच्या किमतीने अंकाला गुणावे म्हणजे अंकाची स्थानिक किंमत मिळेल.
0 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच म्हणजे 0 असते.
विस्तारीत मांडणी : संख्येतील अंकाच्या स्थानिक किंमती बेरजेच्या रूपात लिहिल्या की संख्येचे विस्तारीत रूप मिळते.
उदा. 15, 37,426 =( 1x 1000000 ) + ( 5x 100000) + ( 3 x 10000) + ( 7 x 1000) +
( 4 x100) + ( 2 x 10 ) + ( 6 x )
= 1000000 + 500000 + 30000 + 7000 + 400 + 20 + 6
सोडविलेली उदाहरणे –
(१) ५,४५,०३५ या संख्येतील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती?
(१) ३९९९० (२) ३९००० (३) ३९९७० (४) ३९७७०
स्पष्टीकरण – ५, ४५, ०३५
किंमत – ४०००० ३० यांच्या किंमतीतील फरक ४०००० – ३० = ३९९७० म्हणजेच
पर्याय क्र. ३ बरोबर
२) ८३४९३०० या संख्येतील ३ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
(१) ० (२) २९९७०० (३) २९७७०० (४) २९९०७०
स्पष्टीकरण – ८३४९३०० फरक ३००००० – ३०० = २९९७००
पर्याय क्र. ३ बरोबर
३) ६८५२५२४ या संख्येमध्ये दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता?
(१) २ (२) ५ (३) ८ (४) ४
स्पष्टीकरण – ६८५२५२४ या संख्येतील दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखी असणारा अंक ४ आहे. कारण ४ ची दर्शनी किंमत ४ व स्थानिक किंमत एककस्थानी स्थानी ४ असल्यामुळे ४ च आहे. म्हणून
पर्याय क्र. ४ बरोबर
४) ५३ शतकातून २० एकक वजा करून त्यात १ शतक मिळविले तर उत्तर किती येईल?
(१) ५३०० (२) ५३८० (३) १०० (४) ५२८०
स्पष्टीकरण – ५३ शतक म्हणजे ५३००
२० एकक = २०
१ शतक = १००
५३००-२० = ५२८०+१००= ५३८०
५) खालीलपैकी कोणत्या संख्येतील ३ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?
(१) ४३४०७ (२) ३०२४८ (३) १०३११ (४) ४०२३२
स्पष्टीकरण – वरील पर्यायातील ३ च्या स्थानाविषयी निरीक्षण करून मग स्थानिक किमतीनुसार सर्वात लहान पर्याय क्र.-४ मधील दशक स्थानी ३ आहे. त्याची किंमत सर्वांत लहान येईल.
पर्याय क्र. ४ बरोबर
६) ५ दह + ३ द.ल. + ३ श+ ७ ह+ २ द. + १ एकक
वरील विस्तारीत मांडणीचे रूप कोणते?
(१) ३०,००,००० + ० + ५०००० + ७००० + ३०० + २० + १
(२) ५००००० + ३०००० + ३०० + ७००० + २० + १
(३) ५३३७२१
(४) ५०००० + ३०००० + ३००० + ७०० + २० + १
स्पष्टीकरण – द.ल. ल. द.ह. ह. शतक दशक एकक
३ ० ५ ७ ३ २ १
स्थानिक किमतीनुसार – ३०,००,००० + ० + ५०००० + ७००० + ३०० + २० + १ ही किंमत येईल.
पर्याय क्र. १ बरोबर
७) ४००००० + ४००० + ४ या मांडणीपासून खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल?
(१) ४०४००४ (२) ४०४००००३ (३) ४४०००४ (४) ४००४०४
स्पष्टीकरण – ४०००००
+ ४०००
+ ४
= ४०४००४
पर्याय क्र. १ बरोबर
८) ७ * ४ * या संख्येत * च्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक ७९२ आहे. तर * च्या जागी येणारा अंक कोणता?
(१) ७ (२) ८ (३) ९ (४) ८००
स्पष्टीकरण – समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक ७९२ आहे. याचा अर्थ तो अंक दिलेल्या ७९२ मधील ७ अंकापेक्षा १ ने जास्त म्हणजे ८ असेल.
म्हणून
पर्याय क्र. – २ बरोबर