इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ


शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वीशिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये वाढकरण्यात आली आहे.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या  प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ

Increase in examination fee for class 5th and class 8th scholarship examination

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता दिनांक २२.०७.२०१० च्या शासन निर्णयामधील प्रचलित अटी व शार्तीमध्ये दि.१५.११.२०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. १०/- वरुन रु. २०/- करण्यास तसेच परीक्षा शुल्क रु. ५०/- वरुन रु. ६०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती व मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रवेशा शुल्क रु. १०/- वरुन रु. २०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यानुसार, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

क्र.

शुल्क

सासन निर्णय  दि. १५.११.२०१६

नुसार शुल्क

सासन निर्णय  दि. १५.११.२०१६

नुसार शुल्क

सुधारित शुल्क

सुधारित शुल्क

बिगरमागास विद्यार्थ्यासाठी

मागास व दिव्यांग  विद्यार्थ्यासाठी

बिगरमागास विद्यार्थ्यासाठी

मागास व दिव्यांग  विद्यार्थ्यासाठी

प्रवेश शुल्क

रु. २०/-

रु. २०/-

रु. ५०/-

रु. ५०/-

परीक्षा शुल्क

रु. ६०/-

शुल्क नाही.

रु. १५०/-

रु. ७५/-

 

शासन निर्णय

Scholarship


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!