इ.५ वी. शिष्यवृत्तीइ.८ वी. शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर


शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत गुरूवार दि. १९ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवार दि. ०७/०९/२०२२ रोजी सायं. ०५.०० वाजता परिषदेच्या  संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

दि. १२ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक,२४/११/२०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. २४/११/२०२१ ते ०५/१२/२०२१ या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. परिषदेकडे विहीत मुदतीत ऑनलाईन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्याच्या गुणांची पडताळणी करून गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी (शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी) तयार करण्यात आली आहे.

शाळांनी निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करावे.

Scholarship

विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करावे.

Scholarship

गुणवत्ता यादी

Tag:- Tag:- Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th, Pre Secondary Scholarship Examination Std 8th,  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!