सेतू अभ्यासक्रम : Bridge Course 2022


सेतू अभ्यासक्रम : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा शिक्षणातील पाया मजबूत व्हावा यासाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मागील इयत्तेतील महत्वाच्या क्षमतांवर आधारित  30 दिवसांचा सेतू शाळांमध्ये शिकवला  जाणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 च्या अहवालामध्ये भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याचं समोर आलंय. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य स्तरावर नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

सेतू अभ्यासक्रम-bridge course

इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी

1.मराठी,  2.इंग्रजी, 3. सामान्य विज्ञान,  4.गणित,  5.सामाजिक शास्त्र

या विषयांसाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.  हा अभ्यासक्रम  विषय निहाय आणि इयत्तानिहाय तयार करण्यात आला आहे. मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर हा अभ्यासक्रम आधारित असणार आहे.

सेतू अभ्यासक्रम 30 दिवसांचा असून शालेय कामकाजाच्या दिवसातच हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या संदर्भात शिक्षक व विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी सूचना दिल्या जाणार आहेत. सेतू अभ्यासक्रमात विद्यार्थी विषयनिहाय कृतीपत्रिका म्हणजेच वर्कशीट  प्रत्येक दिवशी सोडवतील या प्रकारे नियोजन केले गेले आहे.

कसा असणार सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी?

पूर्व चाचणी

राज्यभरातील शाळांसाठी (विदर्भातील शाळा सोडून)

17 व 18 जून 2022

सेतू अभ्यासक्रम 

20 जून ते 23 जुलै 2022

उत्तर चाचणी

25 ते 26 जुलै 2022

विदर्भ भागातील शाळांसाठी कालावधी 

पूर्वचाचणी

1आणि 2 जुलै 2022

तीस दिवसांचा सेतू अभ्यास

4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022

उत्तर चाचणी

8 ते 10 ऑगस्ट 2022


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!