SENIOR AND SELECTION GRADE TRAINING

SENIOR AND SELECTION GRADE TRAINING INFORMATION


Online वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण माहिती

Latest Update

नमस्कार,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी  वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दि. ०२ जुन २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्यावतीकरण करत असताना सदर प्रणाली वापरण्यात वापरकर्त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी सदर  प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळविण्यात येईल.

सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास वेळोवळी https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षणार्थी यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड व

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते.  सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च  माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्याक /प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये

सदरच्या नोंदणी केलेल्या सर्व शिक्षक /मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू हाकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्‍यक खालीलप्रमाणे सुचना सर्व प्रशिक्षणार्थी यांना अवगत करण्यात यावेत.

प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे

  • नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यास सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login या लिंकवर क्लिक करून सुरु करता येईल.
  • या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यास आवश्‍यक युजर आय.डी व पासवर्ड प्रशिक्षणार्थ्याने नावनोंदणी करत असताना पुरविलेल्या मेळ आय.डी वर मेल प्राप्त होईल. ज्या प्रशिक्षाणार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या ईमेळ वर सदर तपशील प्राप्त होणार नाहीत, त्यांना https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर तक्रार नोंदविण्याची सुविधा दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध होईल. अशा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण पूर्ण करण्याची वेळ देखील वाढवून देण्यात येईल.
  • सदरचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १ जुन २०२२ पासून १ जुलै,२०२२ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
  • सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ३० दिवसांच्या कालावधी मध्येच प्रशिक्षणार्थी याने पूर्ण करणे अनिवार्य आहे. तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मळणारनाही याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांनी घ्यावी.
  • प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अँप्लीकेशनन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून सदरच्या अँपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अप्लीकेशन https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard या लिंक वरून प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.
  • प्राप्त युजर आय.डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून प्रणाली वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू हाकतात.

प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे

  • शिक्षकांनी यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी ) प्रशिक्षण असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
  • तसेच यापूर्वी देखील देखील प्रशिक्षण प्रकार बदल करणेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तरी देखील काही प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा असल्यास परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर आवश्यक  सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

प्रशिक्षण चाचणी व स्वाघ्यायाबाबत सुचना

  • सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशरिक्षणा्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य (३० मि), चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे,स्वाध्याय पूर्ण करणे (२ तास) तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे.
  • स्वाध्याय अपलोड करत असताना सदर स्वाध्यायावर प्रशिक्षणार्थी यांनी आपले नाव, रजिष्ट्रेशन नंबर, शाळेचे नाव , युडायस क्रमांक व स्वतःची स्वाक्षरी करणे आवश्‍यक राहील. प्रिक्षणार्थी याचे स्वाघ्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस Start वर क्लिक करून प्रशिक्षण प्रणालीवर ऑनलाईन स्वाध्याय नोंदवावा. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
  • प्रश्रिक्षणामध्ये घटकांवर आधारित चाचणी सोडविण्यासाठी देखील विहित वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे विहित वेळेमध्येच सदरची चाचणी संबंधित प्रशिक्षणार्थ्याने पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  • तसेच चाचणी ही घटकनिहाय असल्याने एका घटकाची चाचणी सोडविल्यानंतर प्रणाली वर Proceed To Next Section वर क्लिक करावे. कोणत्याही परीस्थीतीमध्ये सर्व घटकावरील चाचणी सोडवून झाल्याशिवाय FinishText वर क्लिक करू नये. अन्यथा प्रशिक्षणार्थ्याची चाचणी बंद होऊन प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या प्रशिक्षणाची चाचणी पुन्हा देणे शक्य  होणार नाही याची नोंद घ्यावी.
  • स्वाध्याय व चाचणी सोडविताना घ्यावयाची आवश्‍यक काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक चित्रफितीमध्ये सविस्तर विषद करण्यात आलेली आहे. सर्व प्रश्निक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.
  • सर्व मोड्यूल्सनिहाय (घटकनिहाय) चाचण्या मिळून एकूण ४०% गुण प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील; तरच संबंधित प्रश्रिक्षणार्थ्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.
  • प्रशिक्षणार्थी यांनी प्रणालीवर व्यतीत केलेला वेळ व प्रशिक्षण कार्यक्रमाची वेळ (एकूण कालावधी) , पाहिलेले व वाचलेले अध्ययन साहित्य, पूर्ण केलेले स्वाध्याय, चाचणी मधील प्राप्त गुण, इत्यादी या सर्वांचे मूल्यमापन केले जाणार आहे व त्यानंतरच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था प्रणालीमध्ये करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. प्रशिक्षाणार्थ्यांचे स्वाध्याय हे प्रकाशित केले जाऊ शकतात याची नोंद घ्यावी.

प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत महत्वाचे

  • प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशरिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली मध्येच उपरोक्‍त बाबी पूर्ण केल्यावरच डाउनलोड करता येणार आहे याची नोंद घेण्यात यावी.
  • सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रश्रिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी / इंग्रजी ) असेल तसेच व तेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे. याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे FIRST NAME या ठिकाणी आपले अचूक पूर्ण नाव मराठी मध्येच नोंदवावे. तसेच Last Name मध्ये उपलब्ध असणारा क्रमांक असणार आहे.सदरच्या नोंदणी क्रमांकामध्ये प्रशिक्षनार्थ्यांने कोणताही बदल करू नये.याची नोंद घ्यावी.

प्रशिक्षणा बाबत महत्वाच्या सुचना

  • सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी https://youtube.com/playlist?list=PLFJ76Y6VBMZq4ZEsHdEKUVBCdczbqZ98h या लिंकवर क्लिक करून मार्गदर्डानपर व्हिडीओ आपण पाहू हाकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल SOP, Desktop SOP)
  • तसेच आपणास प्राप्त ई मेल मध्ये देखील सदर प्रक्िक्षण पूर्ण करण्यासाठीच्या मार्गदर्शनपर व्हिडीओच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
  • कोणत्याही प्र्रिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाघ्यायाशी संबंधित व्हिडीओ, PDF आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर समाज माध्यमांवर What App, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, ट्वीटर, वेबसाईट, इत्यादी) प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील याची माहिती सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
  • सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवडयक सुचना व महत्वपूर्ण बाबी या सर्व केवळ https://training.scertmaha.ac.in/ या या परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील.
  • सदरचे ऑनलाईन प्रश्रिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन /निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही ; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
  • प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दैनिक ( दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत) सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेमध्ये प्रशिक्षण हांका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकावर दूरध्वनी करू नये अथवा ईमेल करू नयेत.
  • तसेच प्रशिक्षणाबाबतीतील काही शांका अथवा प्रशिक्षण प्रकार बदल, ईमेल बदल अथवा इतर अनुषंगिक बदल याबाबत आवश्यक तक्रार निवारणासाठी आवश्यक फॉर्म व सूचना https://training.scertmaha.ac.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • ज्या शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अध्यापक विद्यालयातील अध्यापक यांनी सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली नाही त्यांना सदर प्रशिक्षणासाठी नव्याने नावनोंदणीबाबत या कार्यालयामार्फत लवकरच सूचना निर्गमित करण्यात येतील.

दैनिक शंका समाधान सत्र मिटिंग तपशील

Join Zoom Meeting

https://zoom.us/j/95215685289?pwd=TjdKbW9FTXNtUWxmdjBENGQ1NmFkQT09

Meeting ID: 952 1568 5289

Passcode: SCERT

मोबाईलवरून व संगणक/लॅपटॉप प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदिगक सूचना

Slide
Training Letter_page-0006
Training Letter_page-0007
Training Letter_page-0008
Training Letter_page-0009
Training Letter_page-0010
Training Letter_page-0011
Training Letter_page-0012
Training Letter_page-0013
Training Letter_page-0014
Training Letter_page-0015
Training Letter_page-0016
Training Letter_page-0017
Training Letter_page-0018
Training Letter_page-0019
Training Letter_page-0020
Training Letter_page-0021
Training Letter_page-0022
Training Letter_page-0023
Training Letter_page-0024
Training Letter_page-0025
Training Letter_page-0026
Training Letter_page-0027
Training Letter_page-0028
Training Letter_page-0029
Training Letter_page-0030
Training Letter_page-0031
Training Letter_page-0032
Training Letter_page-0033
Training Letter_page-0034
Training Letter_page-0035
Training Letter_page-0036
Training Letter_page-0037
Training Letter_page-0038
Training Letter_page-0039
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Shadow

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!